मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात; चौघे जागीच ठार

  49

खोपोली : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळ बोरघाटात आज (मंगळवार) भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालाय. एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने कारचा चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत.


ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने पाच वाहनांचा अपघात घडला. पाच वाहनांचा अपघातात कंटेनरने पुढे जाणा-या स्वीफ्ट कारला धडक दिली. स्वीफ्ट कार तिच्या पुढे जणाऱ्या आयशर टेम्पोला मागून धडकली. टेम्पोने तिच्या पुढील वेन्यू कारला जोरदार धडक दिली. या अपघातात स्वीफ्टमधील चारही प्रवासी जागीच ठार झाले तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले. टेम्पोची धडक बसलेल्या वेन्यू कारने पुढे जाणा-या कंटेनरला जोरदार धडक दिली. मात्र हा कंटेनर पुढे निघून गेला.


या अपघातात गौरव खरात (३६), सौरभ तुळसे (३२), सिद्धार्थ राजगुरू (३१) यांचा मृत्यू झाला असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.


महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. या तिन्ही संस्थेच्या सदस्यांनी वेगाने मदतकार्य करत अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरुन बाजूला केली. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

Comments
Add Comment

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी