मुंबई : मुंबईसह राज्यात एकीकडे काँग्रेस आंदोलन करत असताना दुसरीकडे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, मंगलप्रसाद लोढा उपस्थित होते. फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले असताना काही भाजपा कार्यकर्तेही त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.
‘हमसे जो टकरायेगा, मिट्टीमे मिल जायेगा’ अशा घोषणा यावेळी फडणवीसांसमोर देण्यात आल्या. काँग्रेसचा मोर्चा सागर निवासस्थानी आल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपाचे हे कार्यकर्ते जमले होते. यावेळी फडणवीसांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितलं की, नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच नाही. माफी मागायची असेल तर देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल काँग्रेसने मागावी.
“कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही,” असं फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून ‘हमारा नेता कैसा हो, फडणवीस जैसा हो’ अशा घोषणा देण्यात आल्या.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…