हिजाब प्रकरणी सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितले की, कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू असून आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हिजाब प्रकरणी पुन्हा सुनावणीची तारीख देण्यास नकार दिला आणि दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली.


हिजाब प्रकरणी त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करू नका आणि राष्ट्रीय स्तराचा मुद्दा बनवू नका, असे न्यायालयाने म्हटले आहे. काय होत आहे ते आम्हाला माहीत आहे. जर काही चुकीचे असेल तर आम्ही त्याचे संरक्षण करू. योग्य वेळेची वाट पाहा, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.


हिजाब प्रकरणी सुप्रीम कोर्टात लवकर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने सांगितले की, योग्य वेळ आल्यावर या प्रकरणाची सुनावणी केली जाईल. सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. कोर्टाने वकिलांना सांगितले की, हा राष्ट्रीय स्तराचा मुद्दा बनवू नका आणि योग्य वेळी त्यात हस्तक्षेप केला जाईल.


कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम आदेश जारी केला होता की पुढील आदेश येईपर्यंत शाळा पुन्हा सुरू कराव्यात आणि तोपर्यंत शाळांमध्ये धार्मिक पोशाखावर बंदी घालावी. उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. कर्नाटक उच्च न्यायालयातील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ हिजाब प्रकरणी सुनावणी करत आहे. या खंडपीठात मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, जेएम खाजी आणि न्यायमूर्ती कृष्णा ए दीक्षित यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या