मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०२२मध्ये होणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी मंडळाच्या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची मुद्रित प्रत करून विद्यार्थ्यांना वितरण करावे. या प्रवेशपत्रासाठी वेगळे शुल्क घेऊ नये, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
डॉ. भोसले यांनी या पत्रकात म्हटले आहे की, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना मार्च-एप्रिल २०२२च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेचे प्रवेश पत्रे राज्य मंडळाकडून https://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर कॉलेज लॉगिनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी या प्रवेशपत्रांच्या मुद्रित प्रतीवर मुख्याध्यापक/प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी. त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रात बदल असल्यास मुख्याध्यापक/प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी.