देशात एअरटेलची सेवा ठप्प

नवी दिल्ली : मुंबईसह दिल्ली, जयपूर, कोलकाता यांसारख्या देशातील अनेक शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे. एअरटेलची सेवा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडाला आहे. सोशल मीडियावर एअरटेलचे नेटवर्क बंद झाल्याच्या तक्रारी यूजर्स सातत्याने करत आहेत. ट्विटरवर #AirtelDown ट्रेंड करत आहे.


https://twitter.com/airtelindia/status/1492021184846008321

दिल्ली, मुंबई, नोएडा आणि इतर अनेक ठिकाणी फायबर इंटरनेट, ब्रॉडबँड, तसेच मोबाइल नेटवर्कचे सर्व एअरटेल कनेक्शन बंद आहेत. अनेक वापरकर्त्यांनी ब्रॉडबँडच्या समस्यांबाबतही तक्रार केली आहे. वापरकर्त्यांचा दावा आहे की एअरटेल थँक्स अॅप देखील काम करत नाही.


DownDetector च्या मते, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये एअरटेलचे नेटवर्क डाउन आहे.


दरम्यान, एअरटेलने ट्विट करून आउटेजची माहिती मिळाल्याचे सांगितले आहे. कंपनीने म्हटले आहे की, आमच्या इंटरनेट सेवांमध्ये थोडासा व्यत्यय आला आणि यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आता आमची सेवा सुरळीत झाली आहे. आमचे कर्मचारी आमच्या ग्राहकांना अखंड अनुभव देण्यासाठी काम करत आहेत.

Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या