हिंगणघाट जळीत हत्याकांडप्रकरणी आरोपी विकेश नगराळेला जन्मठेप

  94

वर्धा : हिंगणघाट येथील प्राध्यापिका अंकिता अरुण पिसुड्डे हिला भरचौकात पेट्रोल टाकून जाळून मारणारा नराधम विकेश उर्फ विक्की नगराळे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


अंतिम सुनावणीवेळी सरकारी पक्षाची बाजू मांडताना आज अॅड. उज्जवल निकम यांनी अनेक दाखले दिले. संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणाऱ्या आणि थरकाप उडविणाऱ्या या जळीत हत्याकांड घटनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली. तब्बल दोन वर्षांनी या नराधमाला नियतीने न्यायालयाच्या माध्यमातून अंकिताच्या मृत्यूदिनीच शिक्षा सुनावली.


आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे हिंगणघाट येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. बी. भागवत यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केंद्रस्थानी ठेवून आरोपीच्या शिक्षेबाबत दोन्ही बाजूंची मते जाणून घेतल्यावर गुरुवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विशेष शासकीय अभियोक्ता ॲड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले होते. त्यानुसार, आज न्यायालयाने दोषी विकेश उर्फ विक्की नरगाळे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


हिंगणघाट येथील नंदोरी चौकात ३ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी बसमधून उतरल्यावर अंकिता ही नेहमीप्रमाणे महाविद्यालयाकडे जात असताना आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. गंभीर जखमी अंकिताचा नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवार, १० फेब्रुवारी २०२० रोजी मृत्यू झाला. हिंगणघाटच्या वर्दळीच्या चौकातच घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यामुळे, सर्व महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले होते.

Comments
Add Comment

पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने

चोपदाराच्या उद्धटपणामुळे वारीतील स्नेहभाव, प्रेमबंध, सेवाभावाला गालबोट

वारकरी महिलेला जोरात ढकलून दिल्याचा व्हिडीओ व्हायरल सोलापूर : राज्यात सर्वत्र पंढरीच्या वारीचा उत्साह पाहायला

एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना

शाडूच्या मूर्तीना भक्तांकडून पसंती

चिपळूण (वार्ताहर): मुंबई उच्च न्यायालयानेही पीओपी गणेशमूर्ती तयार करण्यावर सुरुवातीला बंदी आणली होती. चिपळूण

प्रत्येकाला विश्वासात घेऊनच शक्तिपीठ महामार्ग होणार - नितेश राणे

महामार्गाचा सध्याचा प्लॅन १०० टक्के बदलणार पालकमंत्री म्हणून प्रत्येकाशी संवाद साधण्यास मी तयार सिंधुदुर्ग :

कुरियरवाला असल्याचे सांगत तरुणीवर बलात्कार प्रकरणी, पोलिसांना तात्काळ कारवाईचे निर्देश

सोसायट्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसह नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन  पुणे: कोंढवा