प्रविण राऊतांना अटक झाल्यामुळे राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले

  79

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शिवसेना-भाजपा यांच्यात जोरदार खडाजंगी सुरु झाली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लेटर बॉम्ब टाकत भाजपावर निशाणा साधला आहे. त्याला आता भाजपा नेत्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. जनाब संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही, घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे, हे आम्हाला चांगलं माहिती आहे, अशा शब्दात भाजपा आमदार अमित साटम यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.


अमित साटम म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला म्हणून किरीट सोमय्यांवर भेकड हल्ले करायचे असा प्रकार संजय राऊतांनी सुरु केला आहे. त्यात प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच राऊतांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नव्हे. पण तुमच्या सारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पाहा. हे या मराठ्याचं तुम्हाला खुलं आव्हान आहे असा इशारा साटम यांनी शिवसेना नेते संजय राऊतांना दिलं आहे.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)