'हत्तीची गरज काय? तुम्ही अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन'

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील पंडित ऑटोमोटिव्‍हच्‍या जागेच्‍या कारणावरुन खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे या दोन्‍ही राजांमध्ये टीकायुध्‍द सुरु आहे. एकमेकांवर हल्लाबोल करण्याची संधी हे दोन्ही नेते कधीही सोडत नाहीत. शिवेंद्रराजेंनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उदयनराजेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, मला चिरडायचे असेल तर हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी माझ्या अंगावर उडी मारली तरी मी चिरडून जाईन, असा टोला त्यांनी लगावला.


आमदार शिवेंद्रराजे यांनी पंडित ऑटोमोटिव्ह कंपनी बेकायदेशीर रित्या खरेदी केल्याचा आरोप करत कामगारांवर अन्याय करणा-या लोकांना राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली देऊन चिरडलं असतं, असं विधान उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंचं नाव न घेता केलं होतं. त्याला शिवेंद्रराजेंनी प्रत्युत्तर दिले.


सातारा एमआयडीसी वाढत नसल्‍याचे एकमेव कारण खासदार उदयनराजे असून उद्योजकांना धमकावणे, दमदाटी करणे, वसुल्‍या करायच्‍या आदी कामे ते आणि त्‍यांचे बगलबच्‍चे करतात. या व इतर अनेक कारणांमुळे सातारा एमआयडीसीऐवजी उद्योजकांनी इतर ठिकाणांना पसंदी दिल्‍याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. कारखानदारांकडून हप्ते घेणं, त्यांना दमटाटी करणं यामुळे सुद्धा साता-यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या आल्या नाहीत आणि असलेल्या कंपन्या निघून गेल्या आहेत. मी ही कंपनीची जागा खरेदी करताना संपूर्ण कायदेशीरपणे खरेदी केली आहे, त्यामुळे उदयनराजेंचे हे आरोप बिनबुडाचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

रेल्वे स्थानकावर चालत्या रेल्वेतून २.३० किलो सोने लंपास

अमरावती : रविवारी संध्याकाळी सुमारे ७ वाजता बडनेरा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले

साताऱ्यात खळबळ: यशवंत बँकेत ११२ कोटींचा महाघोटाळा; माजी अध्यक्षांसह ५० जणांवर गुन्हा दाखल

बनावट कर्ज, कागदपत्रांमध्ये फेरफार; ठेवीदारांच्या कोट्यवधींच्या निधीचा उद्देशबाह्य वापर करून केलेला आर्थिक

पलंगावरुन पडला आणि पोलीस अंमलदाराचा घात झाला

सोलापूर : सोलापूर शहर पोलीस दलातील एका तरुण वाहतूक पोलीस अंमलदाराच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

राज्यात १५ ऑक्टोबरपासून वादळी पावसाचा अंदाज

मुंबईत पावसाची शक्यता कमी ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होताच नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेईल, असा

राज्यातील सरकारी शाळेत मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण

गणित आणि विज्ञान विषयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे पायाभूत ज्ञान दृढ करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उद्देशाने

भाजपाचे विकासाचे, याउलट काँग्रेसचे विनाशाचे राजकारण - बावनकुळे

नागपूर : भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच जनसेवकाच्या भूमिकेतून विकासाचे राजकारण केले आहे. काँग्रेसने