मानवतेला धोका, रशिया कधीही करू शकतो युक्रेनवर हल्ला

  82

न्यूयॉर्क : युक्रेनवरून रशिया आणि नाटो देशांमध्ये तणावाचं वातावऱण आहे. दोन्ही देशांकडून लष्करी पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. रशिया युक्रेनवर कोणत्याही दिवशी हल्ला करू शकतो. तसंच हा संघर्ष पेटला तर याची मोठी किंमत मानवतेला मोजावी लागेल असा इशाराही जॅक यांनी दिला आहे. राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार असलेल्या जॅक यांनी दुसऱ्यांदा असा इशारा दिला आहे. याआधी अमेरिकन अधिकाऱ्यांनी रशियाने जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यातच किमान ७० टक्के लष्कर आणि शस्त्रसाठा एकत्र केला होता.


जॅक सुलिवन यांनी सांगितलं की, जर युद्ध झालं तर युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागेल. मात्र आमची तयारी आणि प्रतिक्रिया यांवर आमचा विश्वास आहे की रशियालासुद्धा यासाठी किंमत मोजावी लागेल. रशिया हल्ला करून लगेच युक्रेनवर ताबा मिळवू शकतो आणि यात ५० हजार जणांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.


सुलिवन यांनी असंही सांगितलं की, अजुनही यावर चर्चेतून तोडगा शक्य आहे. प्रशासनाकडून रशियाचा युक्रेनवर हल्ला करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दुसरीकडे रशियाने मात्र कोणत्याही प्रकारे युक्रेनवर हल्ला करण्याचा किंवा ताबा मिळवण्याचा प्रयत्न नसल्याचं म्हटलं आहे. सीमेवर एक लाख सैनिक हे रशियाच्या सुरक्षेच्या काळजीपोटी तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.


युक्रेनला नाटोचा सदस्य व्हायचं आहे. मात्र याला रशियाकडून विरोध केला जात आहे. नाटो ही जगातील २९ देशांची एकत्रित अशी लष्करी संघटना आहे. आपला शेजारी देश युक्रेन नाटो देशांचा मित्र होऊ नये अशी भावना रशियाची आहे. यामुळे नवे युद्ध छेडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यात अनेक देश भाग घेऊ शकतात.

Comments
Add Comment

बंगळूरुतील चेंगराचेंगरीला आरसीबीच जबाबदार

कॅटच्या अहवालातील निरीक्षणात पोलीस दोषमुक्त नवी दिल्ली : ४ जून २०२५ रोजी बंगळूरुत झालेल्या चेंगराचेंगरीला

‘दुकान बंद करून दक्षिण आफ्रिकेला परतावे लागेल’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प-एलन मस्क यांच्यात पुन्हा जुंपली मस्क यांनी पुन्हा एकदा दिला नवीन पक्ष

आयएनएस तमाल भारतीय नौदलात

मॉस्को : आयएनएस तमाल ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. रडारपासून स्वतःचे अस्तित्व लपविणारी ही

Asim Munir: पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर पुन्हा बरळला!

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देण्याच्या केल्या वल्गना इस्लामाबाद : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर

३५ हजारांचं कर्ज फेडलं नाही म्हणून हिंदू महिलेवर बलात्कार आणि मारहाण, आरोपीला अटक

ढाका : ३५ हजारांचं कर्ज असल्याने हिंदू महिलेला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची गंभीर घटना

अल्लाहच्या शत्रूंना नेस्तनाबूत करू, ट्रम्प-नेतन्याहू यांच्याविरोधात इराणच्या शिया धर्मगुरूंचा फतवा

नवी दिल्ली: इराणचे शीर्ष शिया धर्मगुरूंनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायचे पंतप्रधान