संजय राऊतांचा नातेवाईक आणि मित्रांना हाताशी धरुन १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा

  37

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या मित्रपरिवाराने मुंबईतील कोव्हिड सेंटर्सच्या माध्यमातून १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याची 'ईडी'कडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी स्थापन करुन पुणे आणि मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये कंत्राट मिळवले होते.


https://twitter.com/KiritSomaiya/status/1489795032043646985

संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवले असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच, या प्रकरणी ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.


“संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले. या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केले, २० कोटींचे दुसरे करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.” असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले.


https://twitter.com/KiritSomaiya/status/1489831176835846145

याचबरोबर, “आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. खोटे डॉक्युमेंट्स देवून कॉन्ट्रॅक्ट मिळविला. कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.

Comments
Add Comment

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची

Narayan Rane : "राज शिवसेनेत आला की, उद्धव ठाकरे नगण्य होणार"; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

एवढं प्रेम उतू जातय तर, भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का? : खासदार नारायण राणे मुंबई : “राज ठाकरे पुन्हा उद्धव

पुरावे दिले तर खुलासा करेन; राऊतांच्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंचे थेट आव्हान

आरोप करणे हा राऊतांचा नेहमीचा उद्योग - अमोल मिटकरी मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री

Prasad Lad : बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा गंभीर आरोप

मुंबई : विधान परिषदेत आज भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. लाड यांचं बनावट लेटरहेड वापरून

'ड्रग तस्करी प्रकरणी मकोका अंतर्गत कायदेशीर कारवाई होणार'

मुंबई : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध