Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना अटक

सातारा : राज्यातील नेते आणि त्यांची मुले आणि महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आणि विनापरवाना जमाव जमवून आंदोलन, आंदोलनादरम्यान कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.


साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेने दंडवत आणि दंडूका आंदोलन केले. यावेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना अटक केली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी त्यांना पिपरंद (ता. फलटण) राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना साताऱ्यात आणले.


आंदोलनादरम्यान कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे या महिला नेत्यांचा उल्लेखही केला होता.

Comments
Add Comment