छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करण्यासाठी सोपी प्रक्रिया प्रसिद्ध

नवी दिल्ली : नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने निवासी ग्राहकांसाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती कार्यक्रम अंतर्गत स्वतःहून किंवा त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याद्वारे छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करण्यासाठी सोपी प्रक्रियाप्रसिद्ध केली आहे.


प्रक्रियेतील सूचनांपैकी काही मार्गदर्शक सूचना : लाभार्थ्यांकडून अर्जांची नोंदणी, त्यांची मान्यता आणि प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी एक राष्ट्रीय पोर्टल विकसित केले जाईल. डिस्कॉमच्या स्तरावर तशाच स्वरूपात एक पोर्टल असेल आणि दोन्ही पोर्टल एकमेकांशी जोडली जातील.


नवीन प्रणाली अंतर्गत छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र (RTS) स्थापित करू इच्छिणाऱ्या स्थानिक लाभार्थीना राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज करावा लागेल. लाभार्थ्याने ज्यात अनुदानाची रक्कम हस्तांतरित केली जाईल अशा बँक खात्याच्या तपशीलांसह आवश्यक माहिती सादर करणे आवश्यक आहे . अर्ज करताना , लाभार्थ्याला संपूर्ण प्रक्रिया आणि छतावर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापनेसाठी मिळू शकणार्या अनुदानाच्या रकमेबद्दल माहिती दिली जाईल.


पुढील 15 कामकाजाच्या दिवसांत तांत्रिक व्यवहार्यता मंजूरीसाठी अर्ज संबंधित डिस्कॉमकडे ऑनलाइन पाठविला जाईल. अर्ज डिस्कॉम कडे हस्तांतरित केल्यानंतर तो डिस्कॉम पोर्टलवर देखील प्रदर्शित केला जाईल.


तांत्रिक व्यवहार्यता प्राप्त केल्यानंतर, लाभार्थी डीसीआरच्या अटींची पूर्तता करणारे J3IS द्वारे प्रमाणित ALMM आणि इन्व्हर्टर अंतर्गत नोंदणी असलेले सोलर मॉड्यूल्स निवडून त्याच्या पसंतीच्या कोणत्याही विक्रेत्याकडून सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र स्थापित करेल . निवड करण्यात आलेल्या विक्रेत्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध केली जाईल.


सुमारे सहा ते आठ आठवड्यांत राष्ट्रीय पोर्टल विकसित होईल, अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत, छतावरील सौर ऊर्जा संयंत्रांच्या स्थापनेसाठी डिस्कॉमकडून अनुदान मिळविण्याची विद्यमान प्रक्रिया सुरू राहील आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून अनुदान मिळविण्यासाठी ही एकमेव अधिकृत प्रक्रिया असेल. राह्स्त्रीय पोर्टल सुरु झाल्यानंतर लाभार्थ्याकडे कोणत्याही पर्यायाची निवड करून छतावर सौर ऊर्जा संयंत्र उभारण्याचा पर्याय असेल.


संकेतस्थळे /सोशल मीडियावर विशेषत: छतावरील सौरऊर्जा संयंत्रांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारचे अनुदान मिळविण्यासाठी नोंदणी शुल्क किंवा इतर रक्कम आकारणी बाबत कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या/फसव्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असा सल्ला सर्वसामान्यांना देण्यात येत आहे. यासंदर्भातील विश्वासार्ह माहिती मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mnre.gov.in किंवा SPIN पोर्टल www.solarrooftop.gov.in वर उपलब्ध केली जाईल.

Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान