आरोग्य केंद्रातील निवृत्त शिपायाने उघडलेल्या दवाखान्यात चुकीच्या उपचारांमुळे झाला पाच गावकऱ्यांचा मृत्यू

मुरबाड : बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने मुरबाडच्या धसई परिसरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता. मात्र, त्याला निवृत्त होऊन बराच कालावधी उलटला होता.


बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने दोन दिवसांत पाच जणांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाडमध्ये उघडकीस आला आहे. पांडुरंग घोलप असे या 'बोगस डॉक्टर'चे नाव असून तो धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करीत होता. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या नराधम शिपायाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे शिपाई असलेला पांडुरंग घोलप याने बिनदिक्कतपणे धसईत दवाखाना थाटला होता. नोकरी करतानाच तो या क्लिनिकमध्ये आदिवासींवर उपचार करायचा. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्याचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुच होता. विशेष म्हणजे यापूर्वी काही सजग नागरिकांनी याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. या बेफिकिरीमुळे २४ व २६ जानेवारी रोजी धसईतील इंदिरानगर वाडीतील बारकुबाई वाघ, चिखलवाडीतील आशा नाईक यांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ राम असवले (मिल्हे), अलका मुकणे (मिल्हे), लक्ष्मण मोरे (पळू) यांचाही चुकीच्या उपचारामुळे बळी गेला. या प्रकरणी नातेवाईकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.


याप्रकरणी आदिवासी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने आवाज उठवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उमेश वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत आणि कोणताही परवाना नसतांना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बोगस डॉक्टर घोलप याला पोलिसांनी अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.दरम्यान या प्रकरणात सर्व आदिवासींचा मृत्यू झाल्याने अ‍ॅट्रोसिटी कलम देखील या डॉक्टरवर लावण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

Comments
Add Comment

डिजिटल गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ, सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमधून मुंबईकरांची १२७ कोटींची लूट

मुंंबई: सेक्सटॉर्शन आणि सायबर बुलिंगमुळे मुंबईकरांना १२७ कोटी रुपयांना लुबाडले असल्याचा आकडा पोलीस तपासातून

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या

ज्येष्ठांचा सन्मान करून साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांप्रती बांधिलकी जपणारा

मुंबईतील पाणी कपात घेतली मागे, काय आहे कारण..

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम प्रस्तावित आहे.

निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज

एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई

महापरिनिर्वाणदिनाच्या पूर्वतयारीचा कोकण विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन