नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला, तर एकदिवसीय मालिकेत आफ्रिकेच्या संघाने भारताला क्लीन स्वीप दिला. एकदिवसीय मालिकेतील दारुण पराभवानंतर केएल राहुलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राहुल अजून कर्णधारपदासाठी पूर्णपणे तयार नसल्याचे, क्रिकेटमधील काही जाणकारांचे म्हणणे आहे. त्यावर राहुलनेही आपले मत व्यक्त केले आहे. राहुलने स्वत:च्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास असल्याचे म्हणाला. तसेच पांढऱ्या चेंडूवरील सामन्यांत संघात बदलाची अपेक्षा राहुलने व्यक्त केली.
लोकेश राहुल म्हणाला की, आपल्या देशासाठी खेळणे आणि संघाचे कर्णधारपद सांभाळणे ही अभिमानाची बाब असून स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात बरेच शिकण्यास मिळाले. आगामी विश्वचषक स्पर्धेवर आमचा फोकस आहे. एक संघ म्हणून चांगली कामगिरी करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. मला वाटते, आम्ही गेल्या ४ ते ५ वर्षांत चांगला खेळ दाखवला आहे, पण ही वेळ आमच्यात दर्जेदार खेळ दाखविण्याचा आणि पांढऱ्या चेंडूवरील सामन्यात बदल करण्याची वेळ आली आहे.
कर्णधारपदाबाबतच्या उठलेल्या प्रश्नांवर राहुल म्हणाला की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेतील पराभवापासून वाचण्याचे निमित्त मी शोधत नाही. पण मला वाटते की, आमचा संघ सलग चांगला खेळण्याचा प्रयत्न करत आहे. कर्णधारपद भूषवताना बऱ्याच गोष्टी शिकण्यास मिळाल्या. पराभव आपल्याला विजयाच्या तुलनेत अधिक मजबूत बनविते.”“माझी कारकीर्द कायम अशीच राहिली आहे. मला कायम टप्प्याटप्प्याने सर्वकाही मिळाले आहे.