Sunday, April 20, 2025
Homeमहत्वाची बातमीमुंबईत १०.१० कोटी जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड

मुंबईत १०.१० कोटी जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड

व्यावसायिकाला अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई (हिं.स.) : मुंबई पश्चिम सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी १०.१० कोटी रुपयांचे जीएसटी बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेट उघड केले आहे. सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून, अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या वर्सोवा, येथे असलेल्या मेसर्स नेसिल मेटल डीलर्स प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक असलेल्या एका व्यावसायिकाला अटक केली आहे. लोखंडी कचरा आणि भंगार इत्यादींच्या व्यापारासाठी ही फर्म जीएसटीमध्ये नोंदणीकृत आहे. सीजीएसटी कायदा २०१७ मधील तरतुदींचे उल्लंघन करून, कोणतीही वस्तू किंवा सेवा न घेता १०.१० कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) ची फसवणूक आणि वापर करत होती.

या प्रकरणी संचालकाला सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली आणि त्याला आज अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लानेड, मुंबई यांच्यासमोर हजर केले गेले. त्याला 2 फेब्रुवारी 2022 पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घोटाळे करून, प्रामाणिक करदात्यांची फसवणूक करणाऱ्या आणि सरकारचा महसूल हडपण्याचा गुन्हा करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबई क्षेत्राच्या सीजीएसटी विभागाने मोठ्या प्रमाणावर सुरु केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून आजची कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत, मुंबई पश्चिमने गेल्या सहा महिन्यांत 187.20 कोटी रुपयांची बनावट आयटीसी उघडकीस आणली आणि 13.25 कोटी रुपये वसूल केले. फसवणूक करणारे आणि कर चुकवणाऱ्यांच्या विरोधात, विभाग, येत्या काही दिवसांत मोहीम अधिक तीव्र करणार आहे. जीएसटी चोरी आणि आयटीसी फसवणूक करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -