थंडीच्या लाटेसह दाट धुक्यामुळे २२ ट्रेन रद्द

नवी दिल्ली : उत्तर भारतात अनेक भागात दाट धुके आणि थंडीचा परिणाम दिसून येत आहे. एकीकडे वाढत्या थंडीमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले असतानाच खराब हवामानाचा परिणाम रेल्वे सेवेवरही होत आहे. देशातील अनेक भागात धुके इतके आहे की दररोज अनेक गाड्या कमी दृश्यमानतेमुळे कित्येक तास उशिराने धावत आहेत.


दिल्लीतील काही भागात हलका पाऊस पडला. दुसरीकडे, दाट धुक्यामुळे १३ ट्रेन उशिराने धावत असून २२ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. हावडा-नवी दिल्ली एक्सप्रेस, पुरी-नवी दिल्ली एक्सप्रेस, गोरखपूर-नवी दिल्ली एक्सप्रेस, मुंबई-नवी दिल्ली एक्सप्रेस, कानपूर-नवी दिल्ली एक्सप्रेस यासह सुमारे १३ ट्रेन दाट धुक्यामुळे उशिराने धावत आहेत.


उशिराने धावणाऱ्या या गाड्यांच्या नावांमध्ये भालपूर-आनंद विहार एक्सप्रेस, आंबेडकरनगर-निजामुद्दीन एक्सप्रेस, मुंबई-नवी दिल्ली दादर एक्सप्रेस, विशाखापट्टणम-निजामुद्दीन एक्सप्रेस यांचा समावेश आहे.


राजधानी दिल्लीत गेल्या ७ दिवसांपासून सततच्या थंडीच्या लाटेने नागरिक हैराण झाले आहेत. सलग सातव्या दिवशी दिल्लीला थंडीच्या लाटेपासून पूर्ण दिलासा मिळू शकला नाही. दरम्यान, दिल्लीत आज पाऊस पडू शकतो, अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यामुळे सूर्यदर्शन होणार नाही आणि थंडीचा प्रभाव वाढेल


पावसासोबतच थंड वारेही वाहतील. पंजाब, हरयाणा, दिल्लीसह पश्चिम उत्तर प्रदेशात २३ तारखेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे या राज्यांचे किमान तापमानही २ ते ४ अंशांनी वाढू शकते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

भारतातील सर्वात अनोखे शहर, आतापर्यंत २१ वेळा बदललं नाव

उत्तर प्रदेश  : भारतातील अनेक शहरे जगभरात प्रसिद्ध आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत दिल्ली हे देशातील सर्वात मोठे शहर

एका १३ वर्षांच्या मुलीचा हृदयद्रावक मृत्यू !

फुगा फुगवताना फुटला, अन् श्वास नलिकेत अडकला उत्तर प्रदेश :  बुलंदशहरच्या पहासू भागात एका १३ वर्षांच्या मुलीचा

घरी गेल्यावर आता बॉसचा मेल आणि फोन उचलणं बंधनकारक नाही

नवं विधेयक संसदेत सादर नवी िदल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत ‘राईट

भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय: एस. जयशंकर

नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची

सीमा सुरक्षा झाली अभेद्य!

१२ हजार फुटांवरील श्योक बोगदा लष्करासाठी खुला नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये १२ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर

वंदे मातरमला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत चर्चा

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत एक विशेष चर्चा