Sunday, April 27, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेठाणे-दिवा डाऊन जलद मार्गावर १४ तासांचा मेगाब्लॉक

ठाणे-दिवा डाऊन जलद मार्गावर १४ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वे ठाणे आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉकसह अप जलद मार्गावर 2 तासांचा पायाभूत सुविधा ब्लॉक ठाणे-दिवा दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गांशी संबंधित पूर्वीच्या अनावश्यक ठरलेल्या धीम्या मार्गांना सध्याच्या जलद मार्गांशी जोडण्यासाठी आणि क्रॉसओवरची कामे करण्यासाठी घेणार आहे.

दिनांक 23.1.2022 (शनि/रवि मध्यरात्री) 01.20 वाजलेपासून ते 23.1.2022 रोजी दुपारी 3.20 वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर 14 तासांचा आणि दिनांक 23.1.2022 (रविवार) रोजी दुपारी 12.30 वाजलेपासून दुपारी 2.30 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर 02 तासांसाठी ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत दिवा-ठाणे दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर गाड्या धावतील. यामुळे गाड्या धावण्याचा पॅटर्न खालीलप्रमाणे असेल.

ब्लॉक सुरू होण्यापूर्वी गाड्या धावण्याचा पॅटर्न

दादर येथून दिनांक 22.1.2022 रोजी रात्री 11.40 वाजलेपासून ते दिनांक 23.1.2022 रोजी पहाटे 02.00 वाजेपर्यंत सुटणार्या जलद उपनगरी व मेल/एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते कल्याण डाउन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत.

11003 दादर-सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेस न वळविता आपल्या नियोजित डाऊन जलद मार्गाने व आपल्या नियोजित थांब्यांसह धावेल.

दिनांक 23.1.2022 रोजी मध्यरात्री 00.00 नंतर (22/23.1.2022 ची मध्यरात्र) लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या कल्याणकडे जाणार्या डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील व ह्या गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत.

ब्लॉक सुरू झाल्यानंतर गाड्या धावण्याचा पॅटर्न

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक 23.1.2022 रोजी पहाटे 02.00 वाजलेपासून ते ब्लॉक अवधी पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणार्या उपनगरीय व मेल/एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. कल्याणकडे जाणार्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर थांबणार नाहीत. ठाण्यातील प्रवाशांना दादर, कल्याण आणि पनवेल स्थानकांवरून संबंधित गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे.

कोकणाकडे जाणाऱ्या डाऊन मेल एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्र. 7 वर थांबतील आणि पुढे जातील.

ब्लॉकनंतर, कल्याणकडे जाणार्या डाऊन जलद उपनगरीय व मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे फलाट क्रमांक 5 मार्गे ठाणे-दिवा विभागातील नवीन डाऊन जलद अलाइनमेंटवर कळवा आणि मुंब्रा स्थानकांमधून धावतील.

ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/ दादर/ लोकमान्य टिळक टर्मिनसहून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन गाड्या डाऊन फास्ट मार्गावरून किंवा 5व्या मार्गावरून ठाणे येथे प्लॅटफॉर्म क्र.7 वर येतील आणि नवीन 5व्या मार्गाने (पूर्वीचा डाऊन जलद मार्ग) पारसिक बोगद्यामधून जातील.

दिनांक 22.1.2022 रोजी प्रवास सुरू होणारे एक्सप्रेस गाड्या रद्द

17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस

11030 कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस

12140 नागपूर – मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

दिनांक 23.1.2022 रोजी प्रवास सुरू होणारे एक्सप्रेस गाड्या रद्द

22105 / 22106 मुंबई – पुणे – मुंबई इंद्रायणी एक्सप्रेस

22119 / 22120 मुंबई – करमळी – मुंबई तेजस एक्सप्रेस

11007 / 11008 मुंबई – पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस

17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस

12071 / 12072 मुंबई – जालना – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस

11029 मुंबई – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथे थांबणाऱ्या (शॉर्ट टर्मिनेशन) एक्सप्रेस गाड्या

16346 तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस दिनांक 21.1.2022 रोजी सुटणारी

12052 मडगाव – मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 22.1.2022 रोजी सुटणारी

10112 मडगाव – मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस दिनांक 22.1.2022 रोजी सुटणारी

पनवेलहून सुटणाऱ्या (शॉर्ट ओरिजिनेशन) एक्सप्रेस गाड्या

16345 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस दिनांक 23.1.2022 रोजी सुटणारी

12051 मुंबई – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस दिनांक 23.1.2022 रोजी सुटणारी

10103 मुंबई – मडगाव मांडवी एक्सप्रेस दिनांक 23.1.2022 रोजी सुटणारी

या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणार्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -