नाना पटोले तोंडघशी पडले!

भंडारा : मोदी नावाच्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. पण त्यांचा हा दावा भंडारा पोलिसांनी खोडून काढल्याने आता पटोले यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. आम्ही मोदी नावाच्या कोणालाही अटक केलेली नाही, असे स्पष्टीकरण भंडारा पोलिसांनी दिले आहे.


नाना पटोलेंचा दावा खोडून काढताना भंडारा पोलिसांनी सांगितले की, "सोळा तारखेच्या घटनेबाबत सोशल मीडियावर ज्या अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. या चौकशीत जे काही निष्पण्ण होईल त्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल. याबाबत चौकशीचे निष्कर्ष नंतर कळवले जातील, असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये ५१ टक्के मतांचा संकल्प करा - बावनकुळे

नागपूर : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक सर्कल मध्ये ५१ टक्के मते मिळतील असा संकल्प करा, असे आवाहन

मुंबईसह विविध ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश

ठाणे : मुंबईतील वाकोला प्रभाग क्रमांक ९१ चे उबाठा गटाचे माजी नगरसेवक सगुण नाईक त्यांची कन्या युवासेना कॉलेज कक्ष

पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू, अपघाताने २३ वाघांचा मृत्यू

चंद्रपूर : मागील पावणेचार वर्षात राज्यात ६७९ वाघ आणि बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. त्यात नैसर्गिक मृत्यू असले तरी,

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना