उपराष्ट्रपती नायडूंनी साजरा केला 'भोगी' सण

चेन्नई  : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी चेन्नईत सपत्नीक भोगी सण साजरा केला. उपराष्ट्रपती नायडूंनी पारंपारिक वस्त्र परिधान करून परिवारातील सदस्यांसोबत भोगी- होळीची पूजा केली.

ट्वीटरद्वारे उपराष्ट्रपती म्हणाले, " भोगीच्या सर्वांना शुभेच्छा. भोगी सण आपणास जीवनात नूतन सकारात्मक परिवर्तन स्वीकार करण्याचे महत्व तसेच सभोवताली असलेली नकारात्मकता बाजूला सारण्याची आठवण करून देतो. पवित्र ' भोगी मंटलु ' सर्वांचे जीवन प्रज्वलित करून नवीन आशा, आनंद आणि शांती प्रदान करो. "

मागील वर्षी उपराष्ट्रपती नायडूंनी पणजी येथील राजभवनात कुटुंबातील सदस्यांसोबत भोगी सण साजरा केला होता.

भोगी सण प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात साजरा केला जातो. तीन दिवसांच्या संक्रांती उत्सवाला भोगी पासून सुरवात होते. तेलुगू राज्यात संक्रांतीला फार महत्व आहे. यास 'पेद्दा पंडगा ' देखील संबोधले जाते. जगभरातील तेलुगू बांधव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
Comments
Add Comment

एक लाख 'ड्रोन वॉरियर्स'सह 'भैरव स्पेशल फोर्स' सज्ज

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; भारतीय लष्कराची झेप नवी दिल्ली : आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवत

कुटुंबातील घट्ट नाती ‘लव्ह जिहाद’सारख्या घटना रोखू शकतात: मोहन भागवत

भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात.

‘एक्स’वर महिलांचे आक्षेपार्ह फोटो, 'एआय'च्या गैरवापराबद्दल खासदारांचं मोदी सरकारला पत्र!

नवी दिल्ली : शिवसेना (उबाठा)च्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी नुकतेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि

तिरुपती गोविंदराजस्वामी मंदिरात मद्यपीचा धिंगाणा

तिरुपती : मद्याच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने तिरुपतीमधील श्री गोविंदराजस्वामी मंदिरात धिंगाणा घातल्याचा

'भाजपकडे पाहून संघाचे आकलन करणे चूक'

भोपाळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये वैशिष्ट्यपूर्ण गणवेशाचा वापर करण्यात येत असला आणि शारीरिक कसरतींना

विद्यार्थ्यांना दंडाऐवजी समाजसेवा करण्याचा न्यायालयाचा आदेश; जेईई मेन्स उत्तरपत्रिका फेरफार प्रकरण

नवी दिल्ली : संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई मेन्स) २०२५ च्या उत्तरपत्रिकेत फेरफार केल्याचा आरोप असलेल्या दोन