सनातन धर्मात गौमाता पूजन-सेवेचे विशिष्ट महत्व - अमित शाह

अहमदाबाद : मकर संक्रांती-उत्तरायण पर्वानिमित्त केंद्रीय गृहमंत्री आणि गांधीनगरचे खासदार अमित शाह यांनी अहमदाबाद येथे श्री जगन्नाथजी मंदिरास भेट दिली आणि मंदिरात यथासांग पूजा-अर्चना, आरती आणि दान आदी कार्य केले . यावेळी अमित शाह यांच्या पत्नी सोनल आणि परिवारातील अन्य सदस्य देखील उपस्थित होते.

मकर संक्रांती- उत्तरायण पर्व साजरे करण्यासाठी अमित शाह गृहराज्य गुजरातमध्ये आले होते.

ट्वीटरद्वारे अमित शाह म्हणाले, "सनातन धर्मात गौमाता पूजन-सेवेचे विशिष्ट महत्व आहे. दरवर्षी प्रमाणे उत्तरायण पर्वानिमित्त अहमदाबादच्या श्री जगन्नाथजी मंदिरात गौ पूजन- करण्याचे सौभाग्य लाभले तसेच पूज्य संतजनांचा आशीर्वाद प्राप्त करून पूजा अर्चना केली.जय जगन्नाथ… "
Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या