झोपडया-गोदामे महानगरपालिकेकडून जमीनदोस्त

  122

मीरा रोड (वार्ताहर) :- मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र. ०४ कार्यक्षेत्रातील गोल्डन नेस्ट ते काशीमीरा महामार्गालगत फूटपाथवरील अतिक्रमणे यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानंतर कणकिया, तिवारी कॉलेज समोर मोकळया जागेत असणाऱ्या झोपड्या-गोदामे महानगर पालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आल्या. यावेळी एकूण २३५ झोपड्या, ०४ तबेले, ०४ मंडप डेकोरेटर शेड, ०६ प्लास्टिक भंगारचे गोडाऊन यांचेवर तोडक कारवाई करण्यात आली असून सर्व काही जमीनदोस्त करण्यात आले आहे.



एल.आर.तिवारी कॉलेज समोर कणकिया, सर्वे क्र २५५ या मोकळया जागेत गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत रित्या झोपडया बांधून आपले वास्तव्य करणाऱ्या तशेच मोकळया जागेत गोदाम व तबेले चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यांना विज पुरवठा देखील केला जात होता. अशा अनधिकृत झोपडपट्टीवर कारवाई करण्यात यावी याकरता मीरा-भाईंदर शहरातील अनेक समाजसेवक स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनोज राणे यांनी गेल्या ६ महिन्यांपासून याचा पाठ पुरावा केला होता, मात्र पालिकेला उशिरा जाग आल्याने कारवाईला उशिर झाला असल्याचे राणे यांनी सांगितले आहे.



गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास ०१ पोकलेन,०१ जेसीबी, ०२ कर्षण वाहने यांचे सहाय्याने कारवाई करण्यात आली. तसेच १५ पशु (गाई, म्हशी) कोंडवाड्यात सोडण्यात आल्या आहेत. सदरची कारवाई आयुक्त दिलीप ढोले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांचे मार्गदर्शनाखाली उपायुक्त मारुती गायकवाड यांचे मार्गदर्शन, अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, सहा. आयुक्त कांचन गायकवाड, पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम निरातले, कनिष्ठ अभियंता. विकास शेळके, कनिष्ठ अभियंता सुदर्शन काळे,कनिष्ठ अभियंता योगेश भोईर , कनिष्ठ अभियंता वैभव पेडवी , कनिष्ठ अभियंता शुभम पाटील, कनिष्ठ अभियंता वैभव कुलथे, लिपिक महेंद्र गावंड, फेरीवाला पथक प्रमुख रंजीत भामरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर