किरण माने यांनी घेतली शरद पवार यांची भेट

मुंबई : राजकीय भूमिका घेतल्याने सिने अभिनेते किरण माने  यांना 'मुलगी झाली हो' या सिरियलमधून काढून टाकण्यात आलं. यामुळे मनोरंजन विश्वात आता खळबळ उडाली आहे. एखाद्या अभिनेत्याला जर अशी वागणूक दिली जात असेल तर ही दडपशाही आहे. याप्रकरणी किरण माने यांना सर्वच स्तरातून समर्थन  मिळत आहे.

या भेटीबद्दल किरण माने म्हणाले की,  माझी बाजू मी शरद पवार यांच्या समोर मांडली आहे. माझ्यावर जो अनन्या झाला आहे याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं म्ह्णून मी आज येऊन भेट घेतली. कारण माझ्यावर ज्याप्रकारे अन्याय झाला आहे तो सांस्कृतिक दहशतवादाचं उदाहरण आहे.' पुढे ते म्हणाले,  या विषयी भाजप मधील वरिष्ठांशी मी बोलणार आहे. उदयनराजे भोसले यांच्याशी संपर्क साधला परंतु ते गोव्यात आहेत म्ह्णून बोलणं होऊ शकलं नाही. आज ते येतील. उद्या आमची भेट होणार आहे. आता चेंडू स्टार प्रवाहाच्या कोर्टात आहे . माझ्यावर एका महिलेने आरोप केले असं त्यांचं म्हणणं आहे. मग गुन्हा दाखल करावा. चॅनलने अजून का केला नाही? शरद पवार यांनी माझी बाजू सविस्तरपणे ऐकून घेतली. जवळपास दीड तास चर्चा झाली. सध्या त्यांनी यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. मला आशा आहे मला न्याय मिळेल. स्टार प्रवाहने एकदा स्पष्ट केलं की, मी देखील पुढं काय करायचं? याबाबत निर्णय घेईल. कलाकारावर अनन्या होत असेल, तर राज्यात देखील मराठी चित्रपट महामंडळ आहे त्यांच्याकडे देखील आम्ही जाऊ'
Comments
Add Comment

मेट्रोमुळे टॅक्सी आणि रिक्षा चालक धास्तावले!

'मेट्रो लाइन ३' दक्षिण मुंबईतील प्रवासात क्रांती घडवेल मुंबई: दक्षिण मुंबईत सध्या विकसित होत असलेली 'मेट्रो लाइन

मुंबई भाजपची डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर, 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' उपक्रमाची सुरुवात

पुढील दिवसांत भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन मुंबईकरांचे अभिप्राय आणि मते जाणून घेतील - अमीत साटम मुंबई :

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा