मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपली मुंबई, माझी मुंबई ही देशातील एक नंबरची महापालिका आहे, जिने जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या दिल्या. वर्क फ्रॉम होमची सुविधा या उपक्रमाने अधिक सक्षम केली, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे शुक्रवारी कौतुक केले.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन झाले. त्यावेळी ते बोलत होते. तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे. त्याचा जनतेला अधिकाधिक उपयोग कसा करून देता येईल? याचा विचार व्हावा. सेल्युलर फोन वापरण्यामध्ये देश खूप अग्रेसर आहे. त्याचा जनतेला काही उपयोग करून देता येईल का? याचा विचार करायला हवा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘व्हॉट्सअॅप चॅट-बॉट’द्वारे जनतेला ८० हून अधिक सुविधा घरबसल्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. व्हॉट्सअॅप चॅट-बॉट सुविधेमुळे नागरिकांना सगळी माहिती घरबसल्या मिळणार असून महापालिका, प्रशासन या यंत्रणांशी थेट संवाद साधता येणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेची ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ ही सुविधा ८९९९२२८९९९ या क्रमांकावर उपलब्ध असून या क्रमांकावर मराठीमध्ये ‘नमस्कार’ आणि इंग्रजीमध्ये ‘नमस्ते किंवा हाय’ असा संदेश पाठविल्यानंतर महानगरपालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर प्राप्त होते. आपल्या आवश्यकतेनुसार नागरिकांद्वारे जे-जे पर्याय निवडले जातील, त्या-त्या पर्यायानुसार तब्बल ८० सेवा-सुविधांविषयीची माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध होते.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…