Sunday, July 14, 2024
Homeताज्या घडामोडीसरकारी बंगल्यांना दिली गड किल्ल्यांची नावे; पाहा संपूर्ण यादी

सरकारी बंगल्यांना दिली गड किल्ल्यांची नावे; पाहा संपूर्ण यादी

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता हे बंगले गड किल्ल्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत. यासंदर्भातील अधिकृत पत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी यांनी मुंबई शहराच्या कार्यकारी अभियंत्यांना पाठवले आहे.

मंत्रालयासमोर असणारे बंगले हे मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. या बंगल्यांना आतापर्यंत क्रमांकावरुन ओळखले जात होते. मात्र या बंगल्यांची नावे बदलून त्यांना गडकिल्ल्यांची नावे देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मान्य केला असून यासंदर्भातील पुढील निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या आदेशानुसार आता खालील बंगल्यांची नावे बदलण्यात आली आहेत.

अ ३ – शिवगड (जितेंद्र आव्हाड)
अ ४ – राजगड (दादा भुसे)
अ ५ – प्रतापगड (केसी पाडवी)
अ ६ – रायगड (आदित्य ठाकरे)
अ ९ – लोहगड –
बी १ – सिंहगड (विजय वड्डेटीवार)
बी २ – रत्नसिंधू (उदय सामंत)
बी ३ – जंजिरा (अमित देशमुख)
बी ४ – पावनगड (वर्षा गायकवाड)
बी ५ – विजयदुर्ग (हसन मुश्रीफ)
बी ६ – सिद्धगड (यशोमती ठाकूर)
बी ७ – पन्हाळगड (सुनील केदार)
क १ – सुवर्णगड (गुलाबराव पाटील)
क २ – ब्रह्मगिरी (संदीपान भुमरे)
क ३ – पुरंदर
क ४ – शिवालय
क ५ – अजिंक्यतारा (अनिल परब)
क ६ – प्रचितगड (बाळासाहेब पाटील)
क ७ – जयगड
क ८ – विशाळगड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -