मुंबई : झी मराठीवरील मन उडू उडू झालं हि मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. या मालिकेला आणि त्यातील व्यक्तिरेखांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि इंद्राने आपल्या मनातील भावना दिपूसमोर व्यक्त केल्या आणि दिपूने इंद्राच्या भावनांचा स्वीकार देखील केला. पण दिपूने अजून तिच्या मनातील इंद्राबद्दलच प्रेम इंद्रा समोर व्यक्त केलं नाही आहे. दुसरीकडे कार्तिक देशपांडे सरांकडे सानिकाचा हात मागण्यासाठी भेटायला येतो पण देशपांडे सर त्याची चांगलीच खरडपट्टी काढतात आणि घरातून हाकलून देतात. त्यामुळे सानिका दुखावते आणि घरात कोणाशीच नीट बोलत नाही आहे.
सानिकाचं हे वागणं पाहून बाबा खूप काळजीत आहेत अशातच ते सानिकासाठी साळगावकरचं स्थळ म्हणून विचार करतात. साळगावकर हाच इंद्रा आहे याची कल्पना देशपांडे सरांना नाही. त्यामुळे दिपूवर प्रेम असलेल्या इंद्राच स्थळ सानिकासाठी सुचवल्यावर काय गोंधळ होणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…
मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…
नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…