नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनापूर्वी देशाची राजधानी दिल्ली येथे स्फोटके सापडली आहेत. दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील अमृतसरमध्ये ४-५ किलो आरडीएक्स सापडल्याने खळबळ उडाली आहे.
दिल्लीतील गाझीपूर परिसरातील फ्लॉवर मार्केटमध्ये बेवारस बॅग आढळून आली. बॉम्ब स्कॉडने भाजीमंडी जवळील एका रिकाम्या शेतात खड्डा खोदून ही स्फोटके निकामी केली. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आज, शुक्रवारी सकाळी १०.५० वाजता एका पीसीआर कॉलवर गाझीपूर फूल मंडीजवळ बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर खबरदारी म्हणून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या बॅगेमध्ये स्फोटके आणि आयईडी पेरण्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी एक्सप्लोजिव्ह कायद्याअंतर्गत दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील अमृतसरमध्ये ४-५ किलो आरडीएक्स सापडले आहे. यानंतर स्पेशल टास्क फोर्सने परिसरात शोध मोहिम सुरू केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील गुरुदासपूरमध्येही आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्येच लुधियाना येथील न्यायालय संकुलात स्फोट झाल्याची घटना घडली होती. पंजाबमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वी आरडीएक्स सापडल्याने भीती पसरली आहे.
मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय…
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…