पुणे : फेक कॉल अॅपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सहा जणांना खंडणी घेण्यासाठी आले असता अटक केली आहे.
नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय २८, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय २०,रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय २८), किरण रामभाऊ काकडे (वय २५), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय १९रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार मागील दहा दिवसांपासून १३ जानेवारीपर्यंत सुरू होता. आरोपी उपमुख्यमंत्री यांचा पीए चौबे बोलतोय म्हणून तक्रारदार यांच्या सोबत संपर्क करत होते.