नाशिक : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार, जिल्ह्यात सद्यस्थितीत ७ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १५७, बागलाण ३४, चांदवड १९, देवळा १६, दिंडोरी २४३, इगतपुरी ४६, कळवण ४०, मालेगाव २०, नांदगाव ६४, निफाड ४६८, पेठ ०४, सिन्नर ११०, सुरगाणा १३, त्र्यंबकेश्वर २५, येवला २५ असे एकूण १ हजार २८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत.
तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ८८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३८ तर जिल्ह्याबाहेरील ३१४ रुग्ण असून असे एकूण ७ हजार ८२४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २४ हजार ७६८ रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ लाख ८ हजार १७८ कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.