मुंबई : मन झालं बाजींद या मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत नुकतंच प्रेक्षकांनी पाहिलं कि कृष्णाला शॉक लागून ती शुद्ध हरपते. राया तिला हॉस्पिटलला घेऊन जातो पण रायाला डॉक्टर सांगतात, कृष्णा वाचण्याची शक्यता कमी आहे. रायाला हे ऐकून धक्का बसतो. राया कृष्णाला वाचवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न सुरू करतो. कृष्णाचा जीव वाचतो पण शरीराला जबरदस्त शॉक बसल्याने तिचा उजवा हात निकामी होतो. उजव्या हाताच्या संवेदनाच निघून जातात. त्यामुळे कृष्णाला सीएची परीक्षा देता येणार नाही असा पेच निर्माण होतो.
पण राया कृष्णाच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतो. या सर्व घटनांनंतर कृष्णा आणि राया यांचा लग्नानंतरचा पहिला मकरसंक्रातीचा सण येणार आहे. कृष्णच्या हाताला संवेदना नसल्यामुळे कृष्णाची पतंग उडवण्याची इच्छा पूर्ण होणार का? कृष्णाला हळदीकुकूं समारंभात भाग घेता येणार का? कृष्णासमोरच्या या आव्हानाला ती कशी सामोरी जाणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…