सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर



सिंधुदुर्ग : सिंधूदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी तर उपायध्यक्षपदी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर विराजमान झाले. आज दुपारी यासाठी झालेल्या निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीच्या संचालकांचा ११ विरुद्ध ७ मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीच्या नीता राणे अनुपस्थित राहिल्या. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीने व्हिक्टर डान्टस व सुशांत नाईक यांचे उमेदवारी अर्ज दाखल करून चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा पराभव झाला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत१९ पैकी ११ सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत. तर आठ संचालक पदांवर महाविकास आघाडीच्या संचालकांना विजय मिळवता आला होता. आज गुरुवारी या बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे मनिष दळवी यांनी अध्यक्षपदासाठी तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. तर, महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ११ विरुद्ध ७ अशा मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या सदस्या सौ. अनिता राणे या निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्या होत्या.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष गुप्त पद्धतीने मतदान झाले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी दोन्ही पक्षांकडून दाखल झालेले अर्ज वैध ठरल्याने प्रत्यक्ष गुप्त पद्धतीने मतदान झाले. जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रत्यक्ष उपस्थित राहिले. जिल्हा बँकेकडे येऊन ते पुन्हा जवळच असलेल्या जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते.

या निकालाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळ प्रांत अधिकारी वंदना खरमळे यांनी करताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. घोषणा आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. बहुमत नसतांनाही महाविकास आघाडीने अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाची निवड प्रतिष्ठेची केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. निवडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बँकेला भेट देऊन नूतन अध्यक्ष - उपाध्यक्ष यांचे अभिनंदन केले.

Comments
Add Comment

कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून विठुरायाचे २४ तास दर्शन

सोलापूर : कार्तिकी यात्रेनिमित्त २६ ऑक्टोबरपासून श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 'गोकुळ'चा नवा रेकॉर्ड, तब्बल इतके लाख दुधाची विक्री

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,(गोकुळ) ने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा

अभिजात मराठी भाषा परिषद देशाच्या दृष्टीने महत्त्वाची - उदय सामंत

अमरावती : प्रत्येक भाषेने आपली अस्मिता उभी केली आहे. त्यामुळे ही अस्मिता अखंडपणे पुढे न्यायची असल्यास देशातील

नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयावर महसूल मंत्र्यांची धाड: लाचखोरी उघड, रोकड जप्त

नागपूर : नागपूरच्या दुय्यम निबंधक कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्ट कारभारावर लगाम घालण्यासाठी राज्याचे महसूल

कार्तिकी एकादशीला कोण करणार पंढरपूरला विठ्ठलाची पूजा, शिंदे की पवार?

सोलापूर : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री पूजा करतात. राज्याला उपमुख्यमंत्री असले तर

'लाडक्या बहिणी' भडकल्या! कारण काय?

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. लाडकी बहीण