दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सोहेल कासकरला अमेरिकन एजन्सीने नार्को टेररिझम प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला भारतात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल कासकर हा आता पाकिस्तानात परतला आहे. अमेरिकन एजन्सीने सोहेल बरोबर अटक केलेल्या दानिश अलीला भारतात आणण्यात यश आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस सोहेलला भारतात आणण्याची तयारी करत होते. मात्र, भारतीय पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सोहेल हा दाऊद इब्राहिमचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. नूराचा 2010 मध्ये पाकिस्तानमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता.

अलीकडेच मुंबई पोलिसांना सोहेल कासकर हा दुबईमार्गे पाकिस्तानात परतल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी अमेरिकन एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुंबई पोलीस आणि अमेरिकन एजन्सी यांच्यात समन्वयाच्या अभावावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच अमेरिकेच्या एजन्सीने सोहेल कासकरला भारताकडे न सोपवता त्याला सोडून का दिले असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
Comments
Add Comment

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.

काय चाललंय काय ? एका महिन्यात तीन वेळा बंद पडली मोनोरेल

मुंबई : मध्य मुंबई आणि पूर्वेकडील उपनगरे यांना जोडणारी मोनोरेल ही वेगाने आरामदायी प्रवास करण्यासाठी सुरू

महाराष्ट्राच्या नव्या राज्यपालांनी 'या' भाषेत घेतली शपथ

मुंबई : आचार्य देवव्रत यांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी राजभवनात झालेल्या सोहळ्यात राज्यपालपदाची शपथ