अभिनेते हेमंत बिरजे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात, पत्नीही जखमी; रुग्णालयात दाखल

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात अभिनेता हेमंत बिरजे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगीही किरकोळ जखमी झाली आहे. पुण्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. कारने दुभाजकाला दिलेल्या धडकेनंतर हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.


१९८५ मध्ये आलेल्या ‘टार्जन’ चित्रपटामुळे हेमंत बिरजे प्रसिद्धीस आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “बॉलिवूड अभिनेता हेमंत बिरजे आपल्या पत्नी आणि मुलीसह प्रवास करत असताना हा अपघात झाला. ऊर्से टोलनाक्याजवळ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कारने दुभाजकाला धडक दिली. अपघातात पत्नी आणि मुलीलाही दुखापत झाली आहे”.



हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून मुलगी सुरक्षित आहे. मुलीला कोणतीही दुखापत झालेली नाही. हेमंत बिरजे आणि त्यांच्या पत्नीला पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत. “सर्दी झाली म्हणून गोळ्या खाल्ल्या होत्या. पुण्याच्या दिशेने प्रवास करत असताना डुलकी लागली आणि गाडी दुभाजकाला धडकली,” असे हेमंत बिरजे यांनी सांगितले.


‘टार्जन’ चित्रपटानंतर प्रसिद्धीस आलेले हेमंत बिरजे सध्या मात्र बॉलिवूडपासून दूर आहेत. ते यश ते पुढे टिकवू शकले नाहीत आणि बॉलिवूडपासून दूर होत गेले. हेमंत बिरजे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचे. दिग्दर्शक बब्बर सुभाष आपल्या चित्रपटासाठी अभिनेत्याचा शोध घेत असताना त्यांची नजर हेमंत बिरजे यांच्यावर पडली होती. त्यानंतर हेमंत बिरजे यांना पहिला चित्रपट मिळाला. अभिनेत्री किमी काटकरसोबतच्या काही बोल्ड सीनमुळे चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती.


पण नंतर फ्लॉप चित्रपटांमुळे त्यांना काम मिळणं बंद होत गेलं आणि फक्त एका चित्रपटापुरते लक्षात राहिले. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला.

Comments
Add Comment

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या