दापोली : दापोली तालुक्यातील वनपरिक्षेत्रात बांधतिवरे शिवाजीनगर येथे ३ सागवान प्रजातीची झाडे अनधिकृतपणे तोडल्या प्रकरणी सुनील धोपट (गिम्हवणे भोंजाळी), राजेश दुसार (बांधतिवरे वेताळवाडी), प्रमोद वाडकर (जालगाव ब्राह्मणवाडी) या तिघांना परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले.
या चोरीच्या झाडांचे चिरकाम दापोलीमध्ये केले असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सॉमिल धारकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ जानेवारी रोजी घडली. परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ७ जानेवारी रोजी बांधतिवरे येथे वन कर्मचारी फिरती करिता गेले होते. फिरती दरम्यान शिवाजीनगर बांधतिवरे येथील ३ सागवान झाडे तोडून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा वनरक्षक बांधततिवरे यांनी गुन्हा नोंद केला.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…