विरारमध्ये हजारो लिटर पाणी वाया

  74

नालासोपारा : विरारमध्ये खोदकाम करताना एक जलवाहिनी फुटली होती. त्याला सहा महिने उलटले तरी स्थिती अद्याप जैसे थेच आहे. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा प्रत्यय यानिमित्त विरारच्या नागरिकांना येत आहे.

विरारच्या अनेक भागात, विशेषत: पूर्वेकडील भागात अद्यापही पाण्याची समस्या गंभीर आहे. या भागातील अनेक मागासलेले पाडे आहेत, ज्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पालिकेचे पाणी पोहोचत नाही. तर दुसरीकडे विरार पश्चिमेला एक जलवाहिनी फुटली असून गेल्या अनेक महिन्यांपासून पालिका प्रशासनाला त्याचे भानच नाही. खोदकाम करताना फुटलेल्या या जलवाहिनीतील पाणी वाहून थेट गटारात जात आहे. आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. विशेष म्हणजे, याबाबत तक्रार करून देखील पालिकेने याची दुरुस्ती केलेली नाही.

विरार पश्चिमेतील रेल्वे फाटकानजीक सुमारे सहा महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने रस्त्याचे खोदकाम केले होते. हे काम सुरू असताना रस्त्याखालील पाण्याची जलवाहिनी फुटली, तेव्हापासून आतापर्यंत अनेक महिने या जलवाहिनीतून पाणी वाहून थेट गटारात जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रार देखील केली आहे. मात्र तरीही पालिकेकडून जलवाहिन्यांची दुरुस्ती केली जात नाही. पालिका प्रशासन पाणीप्रश्नाबाबत असा हलगर्जीपणा कसा करू शकते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Comments
Add Comment

हार्बर रेल्वे ठप्प! तांत्रिक बिघाडामुळे नेरूळ ते पनवेल सेवा बंद, संध्याकाळी घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

तांत्रिक बिघाडामुळे आज रविवारी संध्याकाळच्या सुमारास हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत नवी मुंबई: मुंबईतील मध्य

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर