मुंबई : मुंबई उपनगरातील गृहनिर्माण सोसायट्यांना महसूल विभागाने बजावलेल्या अकृषक कराच्या नोटीसांना स्थगिती द्या, अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सोसायट्यांच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली.
मुंबई उपनगरातील सुमारे २० हजार गृहनिर्माण सोसायट्यांना दरवर्षी अकृषिक कर आकारण्यात येतो हा कर अन्यायकारक आहे. ज्यावेळी या सोसायट्यांची बांधकामे झाली त्यावेळी त्यांनी हा कर भरला आहे. तसेच मुंबई शहर विभागातील सोसायट्यांना हा कर भरावा लागत नसताना उपनगरातील सोसायट्यांना हा कर का? याकडे लक्ष वेधत भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या ही बाब लक्षात आणून दिली होती. त्यानुसार त्यावेळी २००८ पासून कर भरण्यासाठी ज्या नोटीस बजावण्यात आल्या होत्या त्याला तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थगिती दिली होती.
त्यानंतर आता पुन्हा ठाकरे सरकारने या नोटीस बजावल्या असून सोसायट्यांना मध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्र लिहून ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यामध्ये नगरसेविका अलका केरकर यांच्यासह वांद्रे येथील सेंट सॅबेस्टीन हौ. सोसायटी आणि सांताक्रूझ येथील सारस्वत गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रतिनिधींचा यामध्ये समावेश होता. कोरोनामुळे आधीच सोसायट्यांना अनेक आर्थिक अडचणींना समोरे जावे लागते आहे. त्यातच आता या अवाजवी कराचा बोजा आल्याने सोसायट्या अडचणीत आल्या अहेत. ही बाब महसूलमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
दरम्यान, महसूलमंत्र्यांनी या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…