लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष आणि उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यंदा विधानसभा निवडणूक लढणार नाहीत. बसपाचे खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी ही माहिती दिली.
यासंदर्भात मिश्रा म्हणाले की, माजी मुख्यमंत्री मायावती आणि मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. समाजवादी पक्षाकडे 400 उमेदवार नसतील तर ते 400 जागा कशा जिंकणार? समाजवादी पार्टी किंवा भाजपा सत्तेवर येणार नाही, बसपा उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणार असल्याचा दावा खासदार मिश्रा यांनी केला.
निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी, उत्तर प्रदेशच्या 403 जागांच्या विधानसभेच्या निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याचे सांगितले आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10, 14, 20, 23, 27 फेब्रुवारी तसेच 3 आणि 7 मार्चला मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…