कोरोनाचा उद्रेक! पंतप्रधान मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

  62

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ४ वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. याआधी शनिवारीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती.


आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1 लाख 68 हजार 63 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 69 हजार 959 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.


सध्या देशात पुन्हा कोरोना वाढत असून सामान्य नागरिक, आरोग्य कर्मचारी, सामान्य नागरिक, संसदेचे कर्मचारी, न्यायालयाचे कर्मचारी आणि न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे.


दिल्लीत या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुंबईतही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढली असल्यामुळे देशातील नागरिकांच्या लसीकरणावर जास्त भर दिला जात आहे.


गेल्या शनिवारी कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. आरोग्य संबंधित विषयांवरील उपाययोजना तसेच लसीकरणाची तयारी, 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत आढावा घेतला. कोरोना आरोग्य सेवा सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टेलीमेडिसिनची सुविधा वाढवावी असे पंतप्रधान म्हणाले आहेत. देशातील कोरोना संबंधी समस्यांवर निराकरण करण्यासाठी टेलीमेडिसिन सुविधा उपयुक्त ठऱेल, रुग्णांना घरबसल्या डॉक्टरांकडून ऑनलाईन सल्ला मिळेल असे पंतप्रधान म्हणाले.

Comments
Add Comment

IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला