४४२ अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत

कल्याण  : ऑक्टोबर पासून कल्याण डोंबिवली परिसरातील ४४२ अनधिकृत नळ कनेक्शन खंडीत करण्याची धडक कारवाई केडीएमसीने केली असून अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा देऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.



कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण ४१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दररोज केला जातो. यापैकी ३६० द.ल.लि पाणीपुरवठा, महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतून आणि ५५ द.ल.लि पाणीपुरवठा एमआयडीसी कडून केला जातो. एवढ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत असूनही काही भागात पाण्याची टंचाई जाणवत असल्याचे दिसून येते. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका परिसरातील अनधिकृत चाळी आणि अनधिकृत इमारतीतील नळ कनेक्शन्स शोधून खंडित करण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागास दिले आहेत.



त्या अनुषंगाने ऑक्टोबर २१ ते आज पर्यंत कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा किरण वाघमारे यांच्या पथकाने डोंबिवली परिसरातील ३६३ अनधिकृत इमारती व अनधिकृत चाळींमधील नळ कनेक्शन शोधून त्याच प्रमाणे कल्याणचे कार्यकारी पाणी पुरवठा अभियंता प्रमोद मोरे यांच्या पथकाने कल्याण परिसरातील ७९ अनधिकृत इमारती व अनधिकृत चाळींमधील नळ कनेक्शन शोधून ते खंडित केले आहेत.
यापुढे ही कारवाई अधिक कठोर स्वरूपात करण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीमध्ये अनधिकृत इमारतींना पाणीपुरवठा देऊ नये असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन