जालना-‘राज्यात तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही.पण जानेवारी अखेरपर्यंत रुग्णसंख्येचा उच्चांक गाठून तोपर्यंत ही लाट कायम राहील’ असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ते जालन्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. राजेश टोपे हे सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
टोपे पुढे म्हणाले, ‘राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचे आहे. आज आपण बघतो आहोत की काल ४५ हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? हे ठाऊक नाही. जसे दुसऱ्या लाटेत दररोज ६५ हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता. तसे या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती बाधित रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणे कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असे वाटते. त्यानंतर तो खाली जाईल असेही तज्ज्ञांचे मत आहे’. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यांतील शाळा बंद करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकांनी सरकारला समजून घेऊन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन टोपे यांनी करत शाळा बंदच राहतील असे म्हटले आहे.
राजेश टोपे पुढे म्हणाले की, सध्या राज्यात १ हजार ७११ रुग्ण आसीयूमध्ये आहेत. त्यातील ८५ टक्के रुग्णांना कुठलीही लक्षण नाहीत. तसंच राज्यात एक लाख ७३ हजार रुग्ण अँक्टिव्ह आहेत. त्यामुळे सध्या टेस्टिंग वाढवण्यावर राज्य सरकारचा भर आहे. जिथे लसीकरण जास्त आहे तिथे मृ-त्यूचं प्रमाण कमी आहे. औरंगाबदमध्ये लसीकरणच प्रमाण कमी आहे.
देशातल्या सर्व राज्यांमध्ये क्वारंटाईनचा कालावधी हा सात दिवसाचाच आहे. महाराष्ट्रातही सात दिवसाचाच क्वारंटाईनचा कालावधी आहे आणि फेब्रुवारीनंतर कोरोनाची लाट ओसरेल असा विश्वासही राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.
सध्या राज्यात १३ टक्के लोकांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर सध्या अतिरिक्त ताण नाही. सध्या लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे. लस घेतलेल्यांना सौम्य लक्षण दिसून येतात. कोरोनाशी लढा देण्यासाठी जिल्हा स्तरावर होम आयसोलेशन किट तयार करणार असल्याचंदेखील यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…