मुंबई : मुंबईतील भायखळा परिसरातील मुस्तफा बाजारजवळील एका लाकडी गोदामाला भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांच्या मदतीने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान या भीषण आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वित्त हानी झाल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ५.१५ च्या सुमारास मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकरच्या मदतीने या आगीवर ९ वाजता नियंत्रण मिळवले. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. या आगीत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. ही आग लेवल २ ची होती, अशी माहिती विभागीय अग्निशमन अधिकारी के.डी. घाडीगावकर यांनी दिली.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…