मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यासाठीचे नियम शनिवारी रात्री जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आता सलून, ब्युटी पार्लर आणि जीम संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत. १० जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत. यापैकी जीम, ब्युटी सलून आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येईल. याआधी ते बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
दरम्यान, सलूनसाठी ५० टक्के क्षमतेसह उघडे राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र सलूनमध्ये मास्क काढता येणार नाही अशाच सेवा सुरु राहतील. फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सलून मधील कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील, असे निर्बंध घालण्यात आले आहेत.
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…