नवी मुंबईत प्रकाश रथ ठरतोय नाका कामगारांसाठी देवदूत

नवी मुंबई : नेत्र हे मानवी शरीरातील खूप महत्वाचे अवयव आहेत. त्यात जर काही विकार झाला, तर त्याची झळ स्वतःवर तर होतेच, पण आयुष्यावरही विपरीत परिणाम होतो. असे होऊ नये हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून घणसोली येथील यंग नेत्र रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत थोरात मागील दहा वर्षांपासून नवी मुंबईतील विविध नाक्यावर जाऊन नाका कामगारांची विनामूल्य डोळे तपासणी करत आहेत.
त्यामुळे अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर केला आहे. तसेच इतरही काही आजार असतील, तर त्याबाबतही मार्गदर्शन करत आहेत. आजतागायत त्यांनी हजारो रुग्ण विनामूल्य तपासून चष्मे देखील वाटप केले आहेत.



डॉ. प्रशांत थोरात यांनी तीन वर्षांपूर्वी एक वाहन खरेदी केले. या वाहनाला प्रकाश रथ नाव दिले. या प्रकाश रथात नेत्र तपासणी संदर्भातील सर्व सामुग्री उपलब्ध आहे.



नवी मुंबईत एकूण दहा कामगार नाके आहेत. या नाक्यांवर अस्थिर मजूर, सुतार, गोवंडी असे कामगार पोटासाठी काम मिळेल म्हणून येत असतात. त्यांची आर्थिक स्थिती फारच नाजूक असल्याने डोळ्यांच्या समस्या असल्या तरी ते काम करत असतात. आजतागायत एकूण दहा हजार नाका कामगारांची तपासणी करून चष्मे देखील विनामूल्य वाटप करण्यात आले आहेत.
गरजूना मदतीचा हात दिल्यानंतर आत्मिक समाधान मिळत असल्याचे, डॉ. प्रशांत थोरात, नेत्र रोग तज्ज्ञ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच