नवी मुंबई : 10 जानेवारीपासून प्रिकॉशन डोस

नवी मुंबई : कोव्हीड लसीकरणामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आलेली असून चार दिवसात 36356 मुलांचे लसीकरण झालेले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 10 जानेवारीपासून आरोग्यकर्मी (HCW), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे (FLW) तसेच सहव्याधी (Comorbid) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांनाही ''प्रिकॉशन डोस'' दिला जाणार आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत 27 डिसेंबर रोजीच तातडीने विशेष बैठक घेत या लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केलेले आहे.

त्यानुसार 10 जानेवारीपासून दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे झालेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना "प्रिकॉशन डोस" दिला जाणार आहे. याकरिता महानगरपालिकेची वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालये आणि तुर्भे येथील माता बाल रुग्णालय त्याचप्रमाणे 23 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत हा प्रिकॉशन डोस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जे आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांनी 12 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतला असेल ते लाभार्थी 10 जानेवारी रोजी प्रिकॉशन डोस घेण्यास पात्र असतील.

नवी मुंबई महानगरपालिकेची 4 रुग्णालये व 23 नागरी आरोग्य केंद्रे याठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना कोव्हीड लसीचा प्रिकॉशन डोस विनामूल्य दिला जाणार असून पात्र लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोस घेऊन कोव्हीड पासून अधिक संरक्षण प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने कऱण्यात येत आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व