मुंबई :आर्थिक वर्ष २०२०-२१मध्ये दावे निकालात काढण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) तिसऱ्या क्रमांकावर आहे. या काळात एलआयसीने ९० टक्क्यांहून अधिक दावे निकाली काढले आहेत. विमा नियामक आणि िवकास प्राधिकरणाने (इरडा) याबाबतचा अहवाल जारी केला आहे.
या अहवालानुसार आयुर्विम्याचे ११ लाख दावे विमा कंपन्यांकडे आले. त्यापैकी १० लाख ८४ हजार दावे निकाली काढण्यात आले. या दाव्यांपैकी २६,४२२ कोटी रुपये एवढी रक्कम अदा करण्यात आली. तर, ९ हजार ५२७ दावे फेटाळून लावण्यात आले.
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ३१ मार्च २०२१ पर्यंत ९८.६२ टक्के दावे निकाली काढले. २०१९-२० या आर्थिक वर्षात दावे निकाली काढण्याचे हे प्रमाण ९६.६९ टक्के होते.
खासगी विमा कंपन्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ९७.०२ टक्के दावे निकाल काढले. तर, २०१९-२० या आर्थिक वर्षात हेच प्रमाण ९७.१८ टक्के होते.
मॅक्स लाइफ : ९९.३५%
एगॉन : ९९.२५%
भारती अक्सा : ९९.०५%
एलआयसी : ९८.६२%
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…