बदलापूर : बदलापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शहरातील पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेला मंजूर कर्मचारी फक्त १२२ असून सध्या १०५ पोलीस कर्मचारी तैनात आहेत,
तर पश्चिमेला मंजूर कर्मचारी ५० असून सध्या ७० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांवरच ताण पडत आहे. बदलापुरात दिवसासुद्धा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच करोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे बदलापुरातील पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांसह नवीन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…