Friday, October 24, 2025
Happy Diwali

फ्लेमिंगोच्या प्रतिकृती पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी

मुंबई : मुलुंडच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली उड्डाण पुलाजवळ फ्लेमिंगोच्या प्रतिकृती बसवण्यात आल्या आहेत. या महामार्गाजवळून जाणाऱ्या वाहनचालकांचे व पादचाऱ्यांचे या प्रतिकृती लक्ष वेधून घेत असून आकर्षणाचे केंद्र बनले आहे. त्याचबरोबर या प्रतिकृती बघण्यासाठी व त्यांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये घेण्यासाठी अनेक नागरिक, तरुण पिढी या परिसराला भेट देत आहेत.

फ्लेमिंगो हे पक्षी मूळचे आफ्रिका आणि अमेरिकन देशांमध्ये आढळून येतात. तेथून ते काही काळासाठी स्थलांतरीत होऊन भारतासह काही देशांमध्ये येतात. काही वर्षांपासून मुलुंड-ठाणे जवळील खाडीत फ्लेमिंगो पक्षी काही दिवसांसाठी स्थलांतरीत होऊन यायला लागल्याने त्यांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी गर्दी करू लागले आहेत. ठाणे खाडी परिसर अनेक पक्षांचे माहेरघर आहे. येथे केवळ फ्लेमिंगोच नाही तर अनेक दुर्मिळ प्रजातीचे पक्षी देखील दिसतात. ग्रीन शैक्क, ब्राह्मणी पतंग, लिटिल एग्रेट्स, सी गर्ल्स, कॉमन सैन्डपायपर्स, पेन्टेड स्ट्रोक, इत्यादी पक्षी येथे नेहमीच आढळून येतात.

Comments
Add Comment