राज्यात नाईट कर्फ्यूचा विचार, ७०० मेट्रीक टन ऑक्सिजन लागल्यास पूर्ण लॉकडाऊन

मुंबई : मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत काही अनावश्यक गोष्टींवर निर्बंध लावावे लागतील. महापालिकेच्या वतीने काही कडक निर्बंध लागू शकतात. मुंबईत जीवनावश्यक वस्तू सोडून नाईट कर्फ्यू लावता येईल का? याबाबत सध्या विचार सुरू आहे. रात्रीच्या फिरण्यावर, हॉटेलिंगवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. गरज असल्यास रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा प्रस्ताव आहे, असे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.


राज्यातील ६० लाख मुलांचे लसीकरण करायचे आहे. दररोज ३ लाख मुलांचे लसीकरण याप्रमाणे प्रयत्न करत आहोत. १५ ते २० दिवसांमध्ये हे लसीकरण होऊन जाईल. किशोरवयीन मुलांना स्वत: सुरक्षित राहायचे असेल, कुठे जायचे असेल तर लसीकरण करुन घ्या. बर्गर आणि पिझ्झा घ्यायचा असला तरी लस बंधनकारक केली आहे. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, असे आवाहन राजेश टोपे यांनी किशोरवयीन मुलांना केले आहे.


कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत धार्मिक स्थळ पूर्णपणे बंद होती. पण, नवरात्रीच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळं आणखी बंद होतील का? अशी भीती आहे. त्याबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले असून सर्वच धार्मिक स्थळांवर गर्दी टाळावी लागेल. सर्वत्र गर्दी टाळण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आपल्याला कडक लॉकडाऊन करायचे नाही. पण, गर्दी होऊ नये यासाठी राज्य सरकार आग्रही आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

Comments
Add Comment

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील

मुंबई विमानतळावर ७९ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : डीआरआय मुंबईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ७९ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले असून या प्रकरणी दोन

नवी मुंबई विमानतळाचे 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आगामी 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल