मुंबई : रेल्वे स्थानकावर बुकस्टॉल उपलब्ध होण्यासह रेल्वेचे करोडो रुपये बुडवणाऱ्या ए. एच. व्हीलर कंपनीवर कारवाई व्हावी आणि पूर्वीप्रमाणे स्वतंत्र बुकस्टॉल सुरू करावे. तसेच हे स्टॉल भूमिपुत्रांना मिळावे, अशा अनेक मागण्यांसाठी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाकडून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्यात आले आहे.
वाचन संस्कृतीचा वारसा टिकून राहण्यासाठी रेल्वे स्थानकावर बुक स्टॉल उभारण्यात आले होते. मात्र, मात्र गेल्या काही महिन्यापासून मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकावरील अनेक बुक स्टॉल्सचे रूपांतर खाद्यपदार्थ स्टॉलमध्ये करण्यात आले. बुक स्टॉल चालवणाऱ्या ए. एच. व्हिलर कंपनीने वृत्तपत्र कंपन्यांचे करोडो रुपये थकवले आहेत. वृत्तपत्र कंपन्या त्याची पूर्तता करण्यावरून विचारले असता ए. एच. व्हिलर कंपनीने रेल्वे प्रशासनाला चुकीची माहिती देऊन वृत्तपत्र व मासिके चालत नाही, असे कारण पुढे करुन रेल्वे प्रशासनाकडून खाद्यपदार्थांची विक्री परवानगी घेतली. यामुळे वृत्तपत्र कंपन्यांचे करोडो रुपयांचे नुकसान होणार आहे.
लांबच्या प्रवासात विरंगुळा म्हणून प्रवासी फलाटावरील व्हिलर बुक स्टॉलवरून वृत्तपत्र व मासिके खरेदी करत होती. अनेक वर्षे वाचकांच्या हक्काचे ठिकाण असलेल्या या बुक स्टॉलच्या मूळ उद्देशाचा आता व्हिलर कंपनीसह रेल्वे प्रशासनाला विसर पडला आहे. या स्टॉल्सचा खाद्यपदार्थ विक्री स्टॉलचे रूपांतर झाल्याने येथील वृत्तपत्र मासिकांची जागा खाद्यपदार्थांनी घेतली आहे त्यामुळे वाचकांची प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे.
वृत्तपत्र कंपन्यांचे करोडो रुपये बुडवणाऱ्या ए. एच. व्हीलर कंपनीवर कारवाई व्हावी. तसेच पूर्वीप्रमाणे स्वतंत्र बुकस्टॉल असावे आणि हे स्टॉल्स भूमिपुत्रांना मिळावे, अशी मागणी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाकडून या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाचा तातडीने विचार करावा, अशी मागणी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाकडून मधुसूदन सदडेकर, हरी पवार, जयवंत डफळे आणि संजय चौकेकर, बाळा पवार, जीवन भोसले यांनी केली आहे
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…