कोहली तिसऱ्या कसोटीत खेळू शकतो : द्रविड

जोहान्सबर्ग : भारताचा नियोजित कर्णधार विराट कोहली सध्या तंदुरुस्त असून तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकतो, असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने म्हटले आहे. कोहली पूर्णपणे तंदुरुस्त असावा. मी नेटमध्ये त्याचा सराव करून घेईन. आशा आहे की केपटाऊनमधील काही नेट्स सत्रांनंतर तो खेळण्यासाठी तयार होईल. मी फिजिओशी जास्त बोललो नाही, पण कोहलीच्या फिटनेसमध्ये खूप सुधारणा होत आहे आणि चार दिवसांचा कालावधी आहे आणि तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे विराट खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने संघाची धुरा सांभाळली. मात्र, पाहुण्यांची फलंदाजी ढेपाळली आणि भारताला पराभव पाहावा लागला. दमदार विजयासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. उभय संघांमध्ये ११ जानेवारीपासून निर्णायक तिसरी आणि अंतिम कसोटी रंगणार आहे.
Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

अर्शदीपने मोडला बोल्टचा विक्रम

बुमराहलाही टाकले मागे नवी दिल्ली : भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषकात आपल्या

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना