ठाणे: ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार दिनांक ०८ जानेवारी, २०२२ ते सोमवार दिनांक १० जानेवारी,२०२२ पर्यत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे) ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
रेल्वे विभागाकडून शनिवार दिनांक ०८ जानेवारी, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासुन ते सोमवार दिनांक १० जानेवारी, २०२२ रोजी पहाटे ०२.०० वाजेपर्यत अभियांत्रिकी कामांसाठी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाकडून विशेष जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या मार्गावर सरासरी ५ मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात २३० बसफेऱ्या आणि चेंदणी कोळीवाडा (ठाणे ) ते दिवा या मार्गावर १० मिनिटांच्या प्रस्थानांतराने दिवसभरात १०२ बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेंदणी कोळीवाडा व मुंब्रा रेल्वे स्थानक येथे पर्यवेक्षकिय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कामासाठी संपर्क अधिकारी म्हणुन सचिन दिवाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी प्रवाशांनी मेगाब्लॉक कालावधीत बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…